बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल

0
496

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीसोबत लग्न केले. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली तसेच तिने एका मुलाला जन्म दिला. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 20 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 17 वर्षीय मुलीसोबत तिचे वय कमी असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी लग्न केले. मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन तिला गरोदर केले. अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीदरम्यान रुग्णालयात तिची नोंदणी करण्यात आली. त्यावेळी ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.