‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?

0
72

बारामती, दि. १० (पीसीबी)- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात येणार आहे.

महाआघाडीच्या उमेदवार म्हणून शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अशा लक्षवेधी लढतीकडे देशाची नजर आहे. आजवरच्या विविधित पाहणी अहवालात सुळे यांना मोठी सहानुभूती दिसून आली आहे. स्वतः शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करत जुन्या विरोधकांना एकत्र केले. अजितदादा सुद्धा तोच प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजप ची यंत्रणा मदतीला आलेत. आता खुद्द मोदी मैदानात उतरणार आहेत.