बांधकाम साईटवरील साहित्य चोरणाऱ्यास अटक

170

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) – बांधकाम साईटवरील साहित्य चोरताना एकाला सुरक्षारक्षकाने रंगेहात पकडले. ही घटना गुरुवारी (दि. 29) रात्री हिंजवडी येथे घडली.

संतोष सतीश गायकवाड (वय 24, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक ऋषिकेश आरबाड (वय 20, रा. माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील अग्निशमन केंद्राच्या समोरील बाजूस असलेल्या एका साईटवर फिर्यादी सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. फिर्यादी हे काम करत असलेल्या साईट वरून आरोपी संतोष गायकवाड प्लेट घेऊन जात असताना आढळला. फिर्यादी यांनी त्याला अडवून विचारपूस केली. त्यावेळी तो पळून जाऊ लागला फिर्यादींनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.