बांधकाम करण्यास अटकाव; तिघांवर गुन्हा दाखल

0
91

पिंपरी, दि. १७ (पीसीबी)- बांधकाम करण्यासाठी अटकाव करून दमदाटी करत रहदारीचा रस्ता बंद केला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 ते 16 जानेवारी दरम्यान निघोजे येथे घडली.

प्रदीप उद्धव आल्हाट (वय 30), उद्धव आल्हाट (वय 58), आदिनाथ आल्हाट (वय 60, सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल संजीव रेड्डी (वय 27, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेड्डी यांनी निघोजे गावात एक गुंठा जागा घेतली आहे. त्या जागेत बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य टाकून त्यांनी बांधकाम सुरु केले असता आरोपी तिथे आले. त्यांनी रेड्डी यांना बांधकाम करण्यास मज्जाव केला. या जागेवर बांधकाम करायचे नाही, अशी धमकी दिली. रेड्डी यांच्या जागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून अटकाव केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.