बहिणीच्या बालविवाह प्रकरणी भावाची पोलिसात तक्रार

0
421

थेरगाव, दि. २१ (पीसीबी)- वडील आणि नातेवाईकांनी 12 वर्षीय बहिणीचा बालविवाह 23 वर्षीय तरुणासोबत केला. तसेच याबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र भावाने हा विरोध झुगारून वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. हा प्रकार 15 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचार वाजता पवारनगर, थेरगाव येथे घडला.

विजय शंकर जाधव (वय ४८, रा. आढले बुद्रुक, ता. मावळ), दोन महिला, केशव अच्युत चव्हाण (वय 23, रा. तुळशी, ता. माढा, जि. सोलापूर), अच्युत चव्हाण, केशव चव्हाण याची बहिण, ब्राह्मण आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या 20 वर्षीय भावाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची लहान बहिण (वय 12) हिचा विवाह केशव चव्हाण याच्यासोबत लाऊन दिला. या लग्नासाठी सर्व आरोपी हजर होते. लग्नाच्या दरम्यान फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना ‘या प्रकाराबाबत कोणास काहीही न सांगण्याबाबत’ धमकावले. फिर्यादी हे घाबरल्याने काही दिवस त्यांनी तक्रार देण्यास टाळले. नंतर फिर्यादी यांनी आईला सोबत घेऊन वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.