बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास

0
97

चिखली, दि. २२ (पीसीबी)- तिसगाव ते पुणे असा बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या पिशवीतून चार लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 19) दुपारी बारा ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिसगाव येथून रविवारी दुपारी बारा वाजता बसने निघाल्या. त्या रात्री आठ वाजता ताम्हाणेवस्ती, चिखली येथे घरी पोहोचल्या. घरी आल्यानंतर त्यांनी सोमवारी त्यांची पिशवी पहिली असता त्यातून चार लाख पाच हजार रुपये किमतीचे 85 ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या पिशवीतून हे दागिने चोरून नेल्याची त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.