बसची वाट पाहत थांबलेल्या कामगाराचा मोबाईल हिसकावला

0
33

भोसरी, दि. ०१ (पीसीबी) : कंपनीच्या बसची वाट पाहत थांबलेल्या एका कामगाराचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 28) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास काजळे पेट्रोल पंपाजवळ मोशी येथे घडली.

संग्राम जनार्दन हांगे (वय 23, रा. मोशी. मूळ रा. लातूर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी वरील दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम हे कामावर जाण्यासाठी मोशी मार्केट यार्ड चौकातील बस थांब्याजवळ कंपनीच्या बसची वाट पाहत थांबले होते. ते मोबाईलवर बोलत असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी हिसका मारून संग्राम यांच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.