बनावट दस्त व घोषणापत्र सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, दुय्यम निबंधक कार्यालयातर्फे पोलिसांकडे तक्रार दाखल

0
153

दस्त नोंदणी करताना बनावट दस्त व घोषणापत्र सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 30 डिसेंबर 2015 रोजी भोसरी, लांडेवाडी येथील दुय्य्म निबंधक कार्यालयात घडलीआहे,

याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.16) फिर्याद दिली आहे, यावरून रतनलाल गुलाबचंद गुंदेशा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने जमिनीचा दस्त नोंदविताना खोटे घोषणापत्र सादर करून बनावट दस्त करून त्यावेळच्या दुय्यम निबंधकाची फसवणूक केली आहे. ही बाब निदर्शनास येताच निबंधक कार्यालयातर्फे भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.