बनावट दस्त करून खाजगी कंपनीसह शासनाची फसवणूक

0
100

दिघी, दि. १९ (पीसीबी) – मूळ दस्तामध्ये अफरातफर करून बनावट दस्त तयार करत एका खाजगी कंपनीची तसेच शासनाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 मे रोजी दिघी येथे घडला.

रोशन प्रफुल तालेरा (वय 35, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रदीप प्रल्हाद बाविस्कर (रा. दिघी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका मूळ दस्तामध्ये स्वतःच्या फायद्या करिता अफरातफर केली. तसेच बेकायदेशीरपणे बनावट दस्त तयार करून दिघी येथील तलाठी कार्यालयात सादर केला. यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची कंपनी डायनामिक लॉजिस्टिक्स आणि शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.