फुकट कॅडबरी दिली नाही म्हणून बेकरीची तोडफोड करत तीन हजार हिसकावले

0
140
close up on a woman's hands holding a bitten piece of chocolate bar

दापोडी, दि.२७ (पीसीबी)- फुकट कॅडबरी दिली नाही म्हणून बेकरीची तोडफोड करत बेकरीमधून तीन हजार रुपये हिसकावून नेले आहेत. हा प्रकार दापोडी येथील जयभारत स्वीट येथे बुधवारी (दि.24) रात्री घडला.

नरेश गुलाबराव सबनानी (वय 44 रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अब्दूल बबलू शेख उर्फ शाहरूख (रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा कामगार बेकरीत काम करत असताना. आरोपी तेथे आला व त्याने फुकट कॅडबरी मागितली. फिर्यादीने त्याला नकार दिला.यावरून चिडून आरोपीने शिवीगाळ करत दगडाने बेकरी ची काच फोडली व फिर्यादीला ढकलून देत गल्ल्यातील तीन हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.