फुकट कपड्यांची मागणी करत कोयत्याचा धाकाने दुकानदाराला लुटले

90

किवळे, दि.२७ (पीसीबी)- फुकट कपड्यांची मागणी केल्यानंतर दुकानदाराने त्याला नकार दिला असता दोन आरोपींनी दुकानात हातात कोयता घेऊन गोंधळ घातला.तसेच दुकानातून कपडे व हजार रुपायांचा हप्ता जबदस्ती काडून घेतला.हा प्रकार गुरुवारी (दि.25) सायंकाळी किवळे येथील वाडी मेन्स वेअर येथे घडला.

याप्रकरणी रोहन राजेश देशमुख (वय 22 रा. किवळे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रफिक शेख व राकेश तेलगू यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी फोन केला व फुकट कपड्यांची मागणी केला.यावेळी फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. यावेळी आरोपी दुकानावर आले व त्यांनी हाताने फिर्यादीला मारहाण केली हातातील कोयत्याने दहशत पसरवली. तसेच फिर्यादीच्या दुकानातून दोन जिन्स पॅन्च व तीन शर्ट तसेच हप्ता म्हणून हजार रुपये हप्ता म्हणून घेऊन गेले. देहुरोड पोलीस तपास करीत आहेत.