प्रेमाची मागणी करत बारा वर्ष लहान तरुणीचा पाठलाग

0
162

भोसरी, दि. २३ (पीसीबी)-वयाने १२ वर्ष लहान असलेल्या तरुणीचा ३६ वर्षीय व्यक्तीने उन प्रेमाची मागणी करत पाठलाग केला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिच्याकडे लग्नाची मागणी करून विनयभंग केला. ही घटना ऑगस्ट २०२१ ते २२ जानेवारी २०२३ या कालावधीत गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडली.

मार्तंड भीमराव पवार (वय ३६, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, अशी मागणी करत मार्तंड याने फिर्यादी तरुणीचा पाठलाग केला. फिर्यादीला रस्त्यात अडवून प्रेमास होकार देईपर्यंत हात सोडणार नाही, असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.