प्राधिकरणात दीड लाखांची घरफोडी

0
27

पिंपरी, दि. ४ (पीसीबी)

खिडकीचे गज वाकवून त्‍याद्वारे चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सोन्‍या-चांदीच्‍या दागिन्‍यांसह एक लाख ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण, निगडी येथे मंगळवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली.
साकेत देवकीनंदन भट (वय ४१, रा. टेल्‍को हौसिंग सोसायटी, पेठ क्रमांक २८, प्राधिकरण, निगडी) यांनी मंगळवारी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी भट यांचे घर सोमवारी रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी सहा वाजताच्‍या दरम्‍यान कुलूप लावून बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्‍या खिडकीचे गज वाकवून घरात प्रवेश केला. घरातील सोन्‍या-चांदीचे दागिने, रोख पाच हजार रुपये असा एकूण एक लाख ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.