प्रसादाच्या बहाण्याने नागरिकाची सोन्याची चैन केली लंपास

0
122

इंदोरी, दि. २४ (पीसीबी) – प्रसादाच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी एका ५८ वर्षीय नागरिकाकडून सोन साखळी हातचालाखीने लंपास केली आहे. हि घटना गुरुवारी (दि.२२) इंदोरी, ज्योतीबा मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी नारायण मारुती चव्हाण (वय ५८ रा. इंदोरी) यांनी गुरुवारी फिर्याद दिली आहे. यावरून दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीला प्रसादाचा बहाणा करून एका लहान पिशवी मध्ये ५ बिस्कीट पुडे, १ हजार २०० रुपये ठेवायला लावले, पुढे प्रसाद पावन करण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची २० ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन ठेवायला लावली हात चालाखी ने चैन लंपास केली. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.