पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूला घरफोडी

0
107

निगडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूला एका घरामध्ये घरफोडी झाली. चोरट्याने घरातून मोबाईल फोन आणि टॅब चोरून नेला. ही घटना 28 मे रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सौरभ श्रीनिवास जोशी (वय 36, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जोशी हे 28 मे रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास झोपेतून उठले. त्यावेळी त्यांना कपाट उघडल्याचा आवाज आला. त्यांनी हॉलमध्ये जाऊन पाहणी केली असता हॉलच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 55 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि एक टॅब चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.