पोलिसात तक्रार दिल्याने महिलेला मारहाण

206

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या कारणावरून एका तरुणाने महिलेला मारहाण केली. महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. महिलेच्या घरावर विटा फेकून मारत नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 8) औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या नवनाथ सलगर (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादीला मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीचा मुलगा त्यांना सोडविण्यास आला असता त्यालाही मारहाण केली. फिर्यादी यांचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले. सायंकाळी फिर्यादींच्या घरावर विटा फेकून मारत नुकसान केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.