पैसे देऊन गर्दी गोळा केली होती का ? मुख्यमंत्र्यानी भाषण सुरु करताच लोक झाले गायब !

128

मुंबई, दि. २२ (पीसीबी): राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुक्ताईनगरचा दौरा केला. जळगांवमधील मुक्ताईनगरला NCP चे नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यातल्या राजकारणानं नवं वळण घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर नवी समीकरणं जुळवण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेतली.

सुरूवातीला या सभेसाठी भरपूर गर्दी जमली होती. पण आश्चर्याची बाब म्हणजे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या गर्दीनं मधूनच काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांची सभा सोडून जाणाऱ्या लोकांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. परिणामी “मुख्यमत्र्यांनी पैसे देऊन गर्दी गोळा केली होती की काय?” असा प्रश्न देखील उपस्थित होतोय . एकनाथ शिंदे यांच्यावर वेदांत -फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होतायेत त्याच पार्शवभूमीवर लोकांना मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यात रस नसल्याचं समोर येतंय.