पेंटींग कंपनीत गुंतवणूकीचे आमिष दाखवून महिलेची सात लाखांची फसवणूक

0
280

सांगवी, दि. ३१ (पीसीबी)- पेंटिंग कंपनीत गुंतवणुकीचे करा कंपनीकडून 4 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेची तब्बल 7 लाख रुपयांची फसणूक करण्यात आली आहे. हा प्रकार सांगवी येथे ऑनलाईन पद्धतीने 2017 पासून आजपर्यंत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नितीन ज्ञानदेव येवले (वय 40) अमित किशोर बांगर (वय 40 रा. पिंपळे सौदागर) याच्यावर फसणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी नितीन याच्या युनायटेड कलर कंपनी या पेंटिंग कंपनीत गुतवणूक केल्यास प्रतिमहिना 4 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांनी वेळोवेळी असे 7 लाख रुपये गुंतवले. याचा कोणताही परतावा आरोपींनी फिर्यादीला दिला नाही. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.