दि. 19 (पीसीबी)- पॅसेंजर घेण्यासाठी रिक्षाचा स्टॉपवर रिक्षा लावली असता रिक्षा चालकाला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (१८ जानेवारी) सायंकाळी गुरुद्वारा चौक, चिंचवड येथे घडली.
तानाजी दगडू पांचाळ (३५,रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल उर्फ मारुती विठोबा राठोड (३०), विठोबा लालचंद राठोड (६५, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी हे रिक्षा चालक आहेत. ते त्यांची रिक्षा घेऊन गुरुद्वारा चौकात रिक्षा स्टॉपवर पॅसेंजर घेण्यासाठी थांबले. रिक्षा नंबरला लावण्यावरून त्यांचा विठोबा राठोड याच्यासोबत वाद झाला. विठोबा याने त्याच्या मुलाला बोलावून घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी तानाजी यांना पाईपने बेदम मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी राहुल राठोड याला अटक केली आहे.