पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत सचिन खिलारेला रौप्य

0
60

पॅरिस पॅरालिम्पिकच्या ७ व्या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह, सचिन ४० वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिले पदक जिंकले होते. याच स्पर्धेत असलेले इतर भारतीय खेळाडू रोहित कुमार १४.१० च्या थ्रोसह नवव्या आणि मोहम्मद यासरने १४.२१ च्या थ्रोसह आठवे स्थान पटकावले.

सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. क्रोएशियाच्या बाकोविक लुकाने १६.२७ मी फेकसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.