पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण

0
72

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

देबाशीस दुल्‍लाल हालदार (वय 22, रा. राजयोग कॉलनी, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. ७) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अरबाज हरिब शेख (वय 24, दोघेही रा. वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली असून त्‍याच्‍या एका अल्पवयीन साथीदारास ताब्‍यात घेतले आहे. या दोघांच्‍याही विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील राजयोग पेट्रोल पंपावर काम करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी देबाशीस त्यांच्या हातावर लोखंडी मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यांचा सहकारी कामगार सम्राट सरकार हा भांडणात मध्‍यस्‍थी करण्‍यासाठी आला असता त्यालाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर हातातील रॉड हवेत फिरून आरोपी म्हणाला की, मी इथला भाई आहे. आमच्या मध्ये कोणी आला तर त्याला तोडणार, असे म्हणत पेट्रोल पंपावरील ग्राहकांना धमकावून दहशत निर्माण केली.