पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांना अटक

0
28
crime

पिंपरी, दि.10 (पीसीबी) चिंचवड,
जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 8 ) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

किरण अनिल शिंदे (वय 23), रोहित अनिल शिंदे (वय 24), नितीन विलास जाधव (वय 20, तिघे रा. आनंदनगर, चिंचवड), युवराज शिवाजी शिंदे (वय 43), विकी महादेव देवकुळे (वय 27, दोघे रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रेम कृष्णा तीपाले (वय 19, रा. विजयनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रेम हे त्यांच्या बंद चिकन सेंटरच्या कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. आरोपी आणि प्रेम यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी प्रेम यांना हाताने, दगडाने व दांडक्याने मारून गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.