पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल

0
296

लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे.

या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर, गडचिरोलीतून नामदेव किरसंड, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, नंदुरबार गोपाळ पाडवी, नागपूर विकास ठाकरे अशा महाराष्ट्रातील सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. जागा वाटपाच्या अंतिम निर्णयाबाबत गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीत होणार आहे. परंतु तत्पूर्वीच काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रात 18 जागा लढवण्याच्या निर्णयावर निर्णय झाल्याची माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदारसंघाची होती. एक ते दोन अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवाराने या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. बापट यांनी मोठ्या मताधिक्याने जोशी यांचा पराभव केला.