पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली मोठे सेक्स रॅके

0
296

पुणे ,दि. २१ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. पुणे शहरात कोयता गँग व गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. पुणे शहरातील काही भागात Sex Racket सुरु आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने हे व्यवसाय सुरु आहे. पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला होता. या प्रकरणी संचालकास अटक केली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी सात मुलींची सुटका केली आहे. या मुली दुसऱ्या राज्यातून आणल्या गेल्या होत्या.

पोलिसांनी मसाज सेंटर चालवणाऱ्या दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात व्यवस्थापक असलेला उत्तम शेषराव सोनकांबळे (वय ३२) व संचालक गजानन दत्तात्रेय आडे याचा समवेश आहे. छापा टाकला त्यावेळी पोलिसांनी उत्तम सोमकांबळे याला अटक केली.

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून कोरेगाव पार्कमध्ये मसाज सेंटरमध्ये देह व्यापार सुरु असल्याची माहिती मिळाली. कोरेगाव पार्कमधील साऊथ मेन रोडवर हे मसाज सेंटर होते. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून भांडाफोड केला. या ठिकाणावरुन पोलिसांनी सात मुलींना ताब्यात घेतले आहे.