पुणे शहरात मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला

184

 पुणे, दि.२५ (पीसीबी) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते.

यावेळी वंदे मातरम… हिंदुस्थान जिंदाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी मसने कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. तर काहीं जणांनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. तसेच पीएफआय विरोधी घोषणाबाजीही मनसेकडून करण्यात आली .मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.