पुणे शहरात बिल्डरचा खून

0
1377

पुणे, दि. २४ (पीसीबी) – पुण्यातील वानवडी परिसरात खळबजनक घटना घडली आहे. पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केला. ही घटना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी येथील एका उच्चभू सोसायटीत घडली आहे . निखील पुष्पराज खन्ना (वय-36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय-38 रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतले आहे.

घरगुती भांडणातून झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी याबाबत वानवडी पोलिसांना कळवले.
मयत निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल, पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.