पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता परवाना बंधनकारक

227

पुणे दि. ११ (पीसीबी) – पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा १९७६ च्या कलम १३ अन्वये गुरे पाळणे व त्यांची ने आण करण्याकरिता परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांसाठी सन २००४ पासून हा कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबत वारंवार नोटीसा तसेच वृत्तपत्रातून निवेदन देवून त्याचप्रमाणे आकाशवाणी, पुणे यांचेमार्फत वारंवार आवाहन करुन परवाना घेणेबाबत कळविणेत आलेले आहे. जे गोठेधारक परवाना घेणार नाहीत, तसेच घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण करणार नाहीत अशा गोठेधारकांवर महाराष्ट्र गुरे नियंत्रण कायदा १९७६ मधील कलम क्र. (३) व (७) नुसार पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. तसेच इतर माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पुणे यांच्या कार्यालयाच्या दुरध्वनी (क्र. ०२०-२५८१२८९०) वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आला आहे.

 

WhatsAppShare