पुणे जिल्ह्यातील दुस-या विमानतळाबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठविला आवाज

0
212

पिंपरी, दि. ८(पीसीबी): पुणे विमानतळावर भारतीय वायु सेनेच्या विमानांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांच्या साेईसाठी जिल्ह्यात इतर ठिकाणी दुसरे विमानतळ उभारण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे संसदेत केली. त्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी मराठीत उत्तर देत राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास तत्काळ मान्यता देण्याची ग्वाही दिली.

लोकसभेत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हा परिसराची लाेकसंख्या दाेन काेटीवर पोहोचली आहे. पुणे शैक्षणिक, व्यवसायिक, आयटीनगरी आहे. पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय आणि देशात हवाई वाहतूक सुरू आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांची संख्या माेठी असून हे विमानतळ देशातील दहाव्या क्रमांकाचे आहे. पुणे विमानतळ भारतीय वायुसेनेचे मुख्य बेस आहे. त्यामुळे वायुसेनेच्या वेळापत्रकानुसार चालविले जाते. त्यामुळे भारतीय वायु सेनेच्या विमानांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी प्रवाशांच्या साेईसाठी जिल्ह्यातील इतर ठिकाणी विमानतळ उभारण्याचे नियाेजन करावे.

त्यावर मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया म्हणाले, मी मराठी माणूस आहे. पुण्याची वृध्दी आणि पुण्याचा विकास करण्याचा माझा संकल्प आहे. पुणे विमानतळावर टर्मिनल केले आहे. दाेन ते तीन आठवड्यात नियाेजन करून टर्मिनलचे उद्घाटन केले जाईल. दुस-या विमानतळाबाबत राज्य सरकारशी चर्चा करावी. त्यासाठी राज्य सरकाराने जागा पाहणी करून आम्हाला अहवाल पाठवावा, त्यावर कार्यवाही केली जाईल. सद्यस्थितीत एका जागेबाबत प्रस्ताव आमच्याकडे आला हाेता. मात्र, शेतक-यांच्या काही अडचणी आहेत.