पीएमपीएमएल बसच्या महिला वाहकाला धक्काबुक्की, अल्पवयीन मुलासह एकजण ताब्यात

252

बोपखेल, दि. २३ (पीसीबी) – पीएमपीएमएल बस च्या महिला वाहका च्या हातातील मशीन हिसाकावून घेत मोबाईलने मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी (दि.22) बोपखेल फाटा ते वडमुखवाडी या रोडवर पीएमपीएमएलमध्ये ही घडली.

याप्रकरणी महिला वाहक यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विकास मारुती सातपुते (वय 30 रा.मोशी) व एक अल्पवयीन मुलाला दिघी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पीएमपीएमएल बस मधून मनपा येथून आळंदी जात होत्या. यावेळी आरोपी हे फिर्यादीजवळ आले व त्यांनी त्यांची मशीन ओढून घेत होते. फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांनी फिर्यादीला मोबाईलने मारले. यावेळी आरोपींना बसच्या खाली उतरवले असता त्यांनी फिर्यादी व चालकाला शवीगाळ करत चालकाला ही धक्काबुक्की केली. यावरून दिघी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे,