पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

0
23

निगडी, दि.५ (पीसीबी)

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 4) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आकुर्डी येथे करण्यात आली.

ओमकार प्रदीप कांबळे (वय 19, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर, धाराशिव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौकाच्या दरम्यान आकुर्डी येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओमकार कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.