पिस्तूल बाळगणारा तरूण जेरबंद

0
62

बेकायदरीत्या पिस्तूल बाळगणार्‍या तरूणाला पिंपरी पोलीसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई चिंचवडमधील रामनगर येथे
करण्यात आली.

सिद्धार्थ मारुती फुले (वय २२, रा. मोहननगर, चिंचवड, मूळ – आंबेगाव, ता. देवनी, लातूर) याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस शिपाई रोहित वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक अतिग्रे तपास करीत आहेत.