पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

0
580

पुणे, दि. २० (पीसीबी) : आळंदी येथे एका तरुणाने पिस्तुलाचा दाखवत नागरिकांना ‘मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या’ अशी धमकी दिली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करत स्वयंघोषित भाईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 19) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.

ओंकार नवनाथ भोसले (वय 18, रा. चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार भोसले याने हातात पिस्टल घेऊन आळंदी मधील चार नंबर शाळेजवळ येत लोकांना धमकी दिली. मी इथला भाई आहे. मला हप्ते द्या, असे म्हणत त्याने परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी ओंकार भोसले याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.