पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

0
389

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह एका तरुणाला गुरुवारी (दि.15) पिंपरीतील झुलेलाल मंदिराजवळून अटक केली आहे.ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने केली आहे.

जतिन उर्फ सोनू बिपीन टाक (वय 29 रा.पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस कर्ममचारी अजित सानप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला झुलेलाल मंदिरापासून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपयांची देशी बनावटीची पिस्टल व 1 हजार रुपयांची दोन जिवंत काडतुसे असा एकूण 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.