पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
198

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 3) रात्री दहा वाजताच्या सुमारास जाधववस्ती, रावेत येथे करण्यात आली.
आनंद उर्फ दाद्या राजू गवळी (वय 21, रा. आझाद चौक, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मयूर दळवी यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत परिसरातील जाधववस्ती येथे एका हॉटेल समोर एकजण पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आनंद गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.