पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
539

दापोडी, दि. 10 (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात वाजता दापोडी येथे करण्यात आली.

मुनाफ रियाज पठाण (वय 27, रा. नानापेठ, पुणे), देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफाडे (वय 27, रा. विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित सानप यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे अल्फा लावल कंपनीसमोर दोघेजण आले असून त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन मुनाफ आणि देविदास या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.