पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक

467

भोसरी, दि. ७ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने एकास अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सव्वासात वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

दादासाहेब बबनराव संत (वय 40, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर शेळके यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी मोशी येथील एस के गार्डन कॉलनी क्रमांक एक येथे एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे, अशी माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत दादासाहेब संत याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 25 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज आढळून आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.