पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

143

चाकण, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) गवतेवस्ती, चाकण येथे करण्यात आली.

माधव उर्फ आप्पा रोहिदास गीते (वय 25, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रवीण मुळूक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माधव गीते याला 31 डिसेंबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो जिल्ह्याच्या हद्दीत आला. तसेच त्याने गावठी पिस्टल बाळगले असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून गुरुवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.