पिकअपच्या धडकेत महिला जखमी

62

भोसरी, दि. १ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव पिकअपने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) सायंकाळी हवालदार वस्ती चौक, मोशी येथे घडली.

याप्रकरणी राहुल सुदाम आल्हाट (वय 36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या वहिनी त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या. त्या हवालदार वस्ती येथे आल्या असता त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिली. अपघात घडल्यानंतर आरोपी पिकअप चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला. यात फिर्यादी यांच्या वहिनी गंभीर जखमी झाल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत