पिंपळे सौदागर येथे वेश्या व्यवसाय प्रकरणी स्पावर कारवाई; दोन महिलांची सुटका

0
250

पिंपळे सौदागर येथे अॅपल ब्युटी सलून अँड स्पावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये स्पा मॅनेजरला अटक करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. २०) सायंकाळी करण्यात आली.

अक्षय धनराज पाटील (वय २४, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा चालक मालक रोहन विलास समुद्रे (वय ३५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), भूषण पाटील (वय ३०, रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. आरोपी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत कारवाई करून पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत स्पा मॅनेजरला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.