पिंपळेनिलख परिसरात अनियमित पाणीपुरवठा; महापालिकेवर हंडा मोर्चा

45

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – मागील तीन ते चार महिन्यापासून पिंपळेनिलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनियमित दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवारी) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता.
पिंपळेनिलख, विशालनगर, कस्पटे वस्ती भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे. हंडा मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. माजी नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, पिंपळेनिलख,विशाल नगर,कस्पटे वस्ती,वाकड येथील नागरिकांना मागील 5 वर्षापासुन पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या 5 वर्षा मध्ये मी 4 वेळा आंदोलन, उपोषण करून प्रशासनाचे पाणी समस्येकडे लक्ष वेधले. त्यानंतर काही प्रमाणात पाणी सुरळीत चालु झाले. परंतु, गेले 4 महिन्यांपासुन पुन्हा माघचेच प्रयोग चालु झाले आहेत.

करदात्या नागरीकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. आज प्रशासनाच्या हातामध्ये सर्व गोष्टी आसताना ही असी कृत्रिम पाणीटंचाई होत आहे ही शोकांतीका आहे. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालुन चाललेला प्रकार थांबवले तर बरं होईल. तसेच पाणी टॅंकरची मुदत संपल्या मुळे पाणी टॅंकरही नागरीकांना मिळत नाहीत. अशा दोन्ही बाजुनी नागरीक कोंडीत सापडले आहेत. दोन आठवण आद्रा धरणातून पाणी मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे दोन आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. दोन आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपुरवठा अधिकारी,लाईनमॅन यांना प्रभागात फिरून देणार नाही असा इशारा कामठे यांनी दिला.