पिंपरी, दि.९ (पीसीबी) – चाकण जवळील पिंपळगाव येथून गावठी दारू बनवण्याचे 1 हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने गुरुवारी (दि.8) सायंकाळी मोहितेवाडी या परिसरात केली.

चाकण पोलीस ठाण्यात कमलेश राजपूत (रा मोहितेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सागर ज्ञानदेव शेडगे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी याने एका खड्ड्यांमध्ये गावठी दारूसाठी एक हजार लिटर हे उग्र वासाचे रसायन भिजत घातले होते. यावेळी पोलिसांना याची खबर लागताच पोलिसांनी छापा टाकून तेथून रसायन तसेच इतर साहित्य असा 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.