पिंपरी विधानसभेच्या विकासासाठी “अबकी बार सिमाताई आमदार”

0
121
  • सिमाताई सावळे यांच्या समर्थनासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर हातागळे यांची फेसबूक पोस्ट विशेष चर्चेत
  • पिंपरी, दि. १० (पीसीबी) – भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ, शहरातील अभ्यासू, आक्रमक नेत्या म्हणून सर्वांना परिचित अशा पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे या पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. दरम्यान, त्यांचे नाव चर्चेत येताच सोशल मीडियातून त्यांच्या अनेक चाहत्यांनी सिमाताई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला असून पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा तर त्याच कशा योग्य उमेदार आहेत याच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर हाताळगे यांनी सिमाताई सावळे यांच्या बद्दल त्यांच्या फेसबूक पेजवर शेअर केलेली पोस्ट खूप व्हायरल झाली असून ती आहे त्याच शब्दांत देत आहोत.
  • किशोर हातागळे म्हणतात…
  • पिंपरी विधानसभा हा सिमाताई सावळे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यातील पिंपरी, दापोडी, कासारवाडी, आकुर्डी, प्राधिकरण या सर्वच भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील महिला व नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. सिमाताईच्या २५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांचा कल हा जास्तीत जास्त पिंपरी विधानसभेच्या कार्यक्षेत्रातच राहीला आहे त्यामुळे तेथील प्रश्न व अडचणी त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत, कार्यक्षम नगरसेविका असल्या तरी प्रभागापुरतं मर्यादित काम करण्यापेक्षा त्यांनी नेहमीच शहराचा विचार अगोदर केला आहे, त्यांचं कार्य व काम करण्याची पद्धत वेगळी आहे शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन त्या सलग तिसऱ्यांदा महापालिकेत शहरवासीयांच्या न्याय हक्कासाठी आपली बाजु कणखरपणे मांडत आहे, सिमाताई एवढे आंदोलने आणि विरोधकांची अभ्यासपुर्वक व पुराव्यानिशी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढुन न्यायालयात जाब विचारणाऱ्या “डॅशिंग महिला नगरसेविका” दुसऱ्या कुणीच नाही. अधिकारी असो वा नगरसेवक चुकीच्या गोष्टीला सडकुन टीका आणि विरोध तर त्या करतातच पण चांगलं काम करणाऱ्या कुठल्याही विरोधकाला शाबासकी देण्यासही त्या मागे सरत नाहीत, विरोध करण्यालाही खुप मोठी हिम्मत लागते ती संपुर्ण शहराला माहीत आहे, शहराचा विकास व त्यासाठी असणारी अभ्यासुवृत्ती, काम करण्याचा अनुभव, इच्छाशक्ती, प्रभावीपणे बाजु मांडण्याचे वक्तृत्वगुण याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
  • पिंपरी विधानसभेला आमदार म्हणुन सिमाताईंचीच गरज आहे कारण पिंपरी विधानसभेत उच्च व मध्यमवर्गीय नागरिक राहतात, आलिशान बंगल्यापासुन ते झोपडीधारक नागरिक तसेच स्थानिक गावकरी असलेला भाग या विधानसभेत मोडतो, त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांचे प्रश्न, सुशिक्षित भागाचे प्रश्न व अडीअडचणी व प्रामुख्याने गावकी भावकीचं राजकारण त्याच पद्धतीशीरपणे हाताळू शकतात, त्या सर्वांना सोबत घेऊन विकासकामे फक्त ताईच करू शकतात कारण ताईंनी कधीही गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता, जातीविरहित राजकारण-समाजकारण करण्याचच काम अखंडपणे केलं आहे, हिंदू मुस्लिम द्वेषाचे राजकारण न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्या जातीय सलोखा जपण्याचे काम अखंड करत आलेल्या आहेत. पिंपरी विधानसभेत काही जण फक्त जातीच्या कार्डावरच निवडणुका लढतात, कुठल्याही विकासाचा अजेंडा नसतो किंवा सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे इच्छाशक्ती. सिमाताई एकमेवच असतील की त्यांचं सर्व मतदारसंघातील महिला व नागरिकांशी विश्वासाचं नातं आहे, नगरसेविका असतानाही स्थायी समितीच्या माध्यमातुन बऱ्याच दुर्लक्षित भागांचा विकास ताईंनी केला, जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी १५ वर्षापासुन विविध मार्गदर्शन मेळावे, तरुणांच्या रोजगारासाठी रोजगार मेळावे, मोफत आरोग्य शिबीर, महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणे, विविध शासकीय अनुदान व शासकीय योजनांचा लाभ, मुस्लिम महिलांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, तळागाळातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जिजाई महिला पुरस्कार अशा कित्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून सिमाताईंनी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजकार्य सुरूच ठेवले आहे.
  • पिंपरीचा विकास हा चिंचवड व भोसरी विधानसभेच्या तुलनेत नगण्य आहे, सर्व समस्या वर्षानुवर्षे आहे तशाच आहेत, त्यात बदल घडवायचा असेल तर आक्रमक व अभ्यासु आमदाराची गरज आहे, सिमाताईंचा अभ्यास व अनुभव पिंपरीचा सर्वांगीण विकास करू शकतो तर आताच वेळ आहे….!
  • त्यामुळं आमचं ठरलंय आता वेळ आहे सर्वांनी ठरवण्याची….
  • पिंपरी विधानसभेचा बुलंद आवाज आता महाराष्ट्र गाजवणार…!