पिंपरी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची ‘आयएएस’ केडरमध्ये निवड

63

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आयुक्त संतोष पाटील यांची ‘आयएएस’ केडरमध्ये निवड झाली आहे. याबाबत भारत सरकारने नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. अत्यंत कार्यक्षम, विनम्र, प्रामाणिक, सकारात्मक अधिकारी, अशी त्यांची ओळख आहे. त्यांची आयएएस केडरमध्ये निवड झाल्याबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

पाटील हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. दोन वर्षे त्यांनी महापालिकेत सेवा केली. कोरोना काळात अतिशय उत्तमपणे पाटील यांनी काम केले. कोरोनाची परिस्थिती हातळण्यासाठी पहिल्या दिवसापासून फील्डवर होते. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांना उत्तम सहकार्य केले. अत्यंत कार्यक्षम, मितभाषी अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे.

दीड वर्षांपूर्वी त्यांची महापालिकेतून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने बदली होती. पाटील यांना आज आयएएस दर्जा मिळाला. त्यांची सनदी अधिकारीपदी बढती झाली आहे.