पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या प्रवक्ते पदी विशाल कसबे

0
236

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस च्या प्रवक्ते पदी शहर सरचिटणीस विशाल कसबे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते ॲड. दिपक राठोड यांनी संपूर्ण राज्यातील प्रवक्त्यांची यादी जाहीर केली.तसेच त्यांना निवडीचे पत्र देखील देण्यात आले.

सदर निवडी या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, रोहित कुमार ,प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या आदेशावरून या निवडी करण्यात आल्या. विशाल कसबे हे काँग्रेस चे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून संपूर्ण शहरात परिचित आहेत.

विशाल कसबे यांनी त्यांच्या कार्याची सुरवात एन.एस. यु.आय.या कॉंग्रेस प्रणीत विद्यार्थी संघटनेपासून कॉलेज अध्यक्ष म्हणून सुरू केली. पुणे जिल्हा सचिव, जिल्हा सरचिटणीस, व शहर अध्यक्ष या पदांवर विद्यार्थी संघटनेत कार्य केले. तसेच युवक काँग्रेस च्या सरचिटणीस पदावर एकदा निवडीने व सध्या संघटनात्मक निवडणूक लढवून काम करत आहेत. त्यांचा शहरात चांगला जनसंपर्क आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची २०१७ ची सार्वत्रिक निवडणुकी देखिल त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढवली आहे. आंबेडकरी चळवळीत देखिल ते सक्रिय पणे कार्यरत आहेत.

सोनियाजी गांधी,राहुलजी गांधी यांच्या विचारांचा व त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा हा जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. राहुल जींनी भारत जोडोच्या माध्यमातून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत या देशातील लहान बालकांपासून अबालवृद्धांपर्यत सर्वांना भेटून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यावर ते सध्या काम करत आहेत .त्यांच्याच कार्याचा धागा पकडून पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेस कार्य करणार आहे.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. अनेक कामांमधून रींग होतेय . शहरातील सर्वसामान्य नागरिक या सर्व भ्रष्टाचाराला वैतागलेली आहे.या विरूद्ध कडक भुमिका घेऊन वारंवार प्रशासनाला या विरोधात जाब विचारणार आहोत. वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाची आंदोलने करणार आहोत असे विशाल कसबे म्हणाले.