पिंपरी, दि. १२ – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन विकास आराखडा अंतर्गत वाकड परिसरातील विविध गटांमध्ये प्रस्तावित रस्ते व अन्य विकास कामांच्या विरोधात स्थानिक नागरिकांत तीव्र संतापाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘घर बचाव संघर्ष समिती, वाकड’ यांच्या वतीने ‘भव्य निषेध मोर्चा’चे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केले. या वेळी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला.
या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब भागवत, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चांदमारे, पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष योगेश भोसले, बी.जी. सूर्यवंशी, सागर वाजे, रावासाहेब डोंगरे, रावसाहेब पाटील, आकाश खरात, किरण संमीनदर, रमेश पंडित, अश्विनीताई पाटील, आशाताई घवी, चारुशीला क्षीरसागर, रामदास कलाटकर, सचिन गाडे, वर्षा राजेंद्र बारवकर, चेतन निकालजे, प्रमोद नेवे, सचिन मेहर, गणेश कुलकर्णी, विशाल भिंगारे, महेबूब शेख, रवी खोत, आनंद जाधव, प्रतीक भानवसे, भानवसे, राजू बरखे, दत्तात्रय कडुसकर, सुनील ओझरकर, विशाल जठाडे, रोहित स्वामी, रामेश्वर भानवसे, गनीभाई, प्रकाश सजगणे, मोन्या नागटीळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मोर्चात जुलमी प्रशासन व राज्यशासनाच्या धोरणांचा जाहीर निषेध करण्यात आला. वाकड परिसरातील रहिवाशांच्या हक्काचे आणि अस्तित्वाचे रक्षण व्हावे, यासाठी ठोस मागण्या मांडण्यात आल्या.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :
- गट क्र. १७६, १७७, १७८, १७९, १८० या भागांतील नवीन विकास आराखड्यातील सर्व प्रस्तावित रस्ते तात्काळ रद्द करावेत.
- झोपडपट्टीतील रहिवाशांना SRA अंतर्गत समाविष्ट करून पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात यावी.
- दत्त मंदिर ते वाकड रस्ता ४५ मीटर ऐवजी २४ मीटर रुंदीवर मर्यादित करण्यात यावा.
- पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झोपडपट्टी भागात प्रस्तावित पोलिस ठाण्याचा आराखडा रद्द करण्यात यावा.
या आंदोलनात वाकड परिसरातील विविध संस्था, मंडळे, महिला मंडळे, युवक संघटना, व्यापारी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परिसरातील दुकानदार, व्यवसायिक, शॉपिंग मॉल्स, फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांनीही या आंदोलनास एकजुटीने पाठिंबा दिला.
मोर्चादरम्यान नागरिकांनी जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला:
“उठा उठा जागे व्हा!
घर वाचवण्यासाठी रस्त्यावर या!!”
हा मोर्चा प्रशासनाच्या दखल घेण्यास भाग पाडणारा ठरला असून, येत्या काळात मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.