पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा सेवा संघाच्या ‘जिजाऊ रथयात्रे’ची सांगता

0
23


पिंपरी, दि. १— मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जिजाऊ रथयात्रे’चे पिंपरी-चिंचवड शहरात भव्य आयोजन करण्यात आले. सर्व जातीधर्मात सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या रथयात्रेचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील मैदानावर सायंकाळी आठ वाजता झाला.

या ऐतिहासिक सोहळ्यात आमदार शंकर जगताप, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभदादा खेडेकर, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अर्जुन तानपुरे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, मराठा सेवा संघ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड आणि जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रथयात्रेची सुरवात १८ मार्च २०२५ रोजी वेरूळ येथून झाली होती आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून फिरून ती पिंपरी-चिंचवड शहरात आली. यात्रा डांगे चौक, थेरगाव चाफेकर चौक, चिंचवड स्टेशन, अजमेरा मार्गे नेहरूनगर, पी.एम.टी. चौक, भोसरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लांडेवाडी अग्निशामक केंद्र शेजारील बुद्ध विहार चौक आणि संततुकारामनगर मार्गे पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकामध्ये संपन्न झाली.