पिंपरीत मनोरंजन नगरीची रचना ! ऋषिकेशदादा संजोग वाघेरे-पाटील युवा मंचातर्फे आयोजन

0
154

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – युवानेतृत्व ऋषिकेशदादा संजोग वाघेरे-पाटील युवा मंच आयोजित वतीने पिंपरी फेस्टीवल या कार्यक्रमा अंतर्गत पिंपरीत बाल जत्रा,महिलांसाठी विविध खेळ शाॅपिंग,खाऊ गल्ली तसेच मनोरंजन नगरीचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श महिला पुरस्काराणे महिलांना सन्मानीत करण्यात आले.

यामध्ये शिक्षण क्षेत्रातील सौ.ज्योती मसंद, इतिहास संशोधन साहित्यिक क्षेत्र, डाॅक्टर सौ.सीमा सागर काळभोर, महिला शरीर सौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती नीतू आडवाणी, गिर्यारोहण स्पर्धेत व मोहिमांमध्ये अतुलनीय कामगिरी श्रीमती अफसाना अत्तार, सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्याबद्दल ब्रम्हकुमारी बी.के.सुरेखा दीदी, पत्रकारीता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल सौ.अश्विनी सातव-डोके, राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु.ज्ञानेश्वरी शेखर कुदळे या महिला भगिनींना मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आले.

त्याचबरोबर बालगोपाळांसह सर्वच वयोगटासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाल्याने सर्वांना या जत्रेत सहभागी होऊन मनमुराद आनंद घेता आला. सर्व ताणतणाव विसरून सर्वांनी मनसोक्त धमाल केली. विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल,शाॅपिंग स्टाॅल्स आपण दिलेल्या प्रतिसादामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना देखील उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध झाला.