पिंपरीगावात विजयादशमीदिवशी 70 फुटी रावणाचे होणार दहन

161

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर भव्य 70 फुटी रावण दहन व मनोरंजनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, दोन वर्ष कोरोना कालखंडानंतर यंदाचा विजयादशमीचा सण  मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर भव्य 70 फुटी रावणाची प्रतिकृती तयार करीत आहोत. विजयादशमीच्या दिवशी जल्लोषपूर्ण वातावरणात रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. याचबरोबर नागरिकांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या शुभहस्ते सायंकाळी 7 वाजता दहनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे,माजी खासदार अमर साबळे,आमदार उमा खापरे,आमदार आण्णा बनसोडे,माजी महापौर उषा ढोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार,जेष्ठ नेते आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेननेचे माजी गटनेते राहुल कलाटे,माजी नगरसेवक सचिन चिखले आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आलेले असून कार्यक्रमाचे संयोजन उमेश खंदारे,हरीश वाघेरे,रवींद्र कदम,कुणाल सातव ,प्रवीण कुदळे,नितीन गव्हाणे,संदीप गव्हाणे,राजेंद्र वाघेरे,सचिन वाघेरे,शेखर अहिरराव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमास माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.