पावसाळ्यात रस्ते खोदकाम बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

0
232

पिंपरी, दि.28 (पीसीबी) – शहरात 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत कोणत्याही प्रकारे रस्ते खोदकाम करू नये, असे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानंतरही रस्ते खोदकाम केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सार्वजनिक आणि खासगी अशा सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी शहरात सातत्याने रस्ते खोदकाम केली जाते. त्यासाठी खोदकाम शुल्क भरून महापालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. तर पावसाळ्यात रस्ते खोदकाम पूर्णपणे बंद ठेवणे अपेक्षित असते.

मात्र, मागील काही वर्षात आवश्‍यक कामांच्या नावाखाली पालिका कंत्राटदार व इतर खासगी संस्थांकडून पावसाळ्यातही खोदकाम सुरू होती. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊन अपघातांना निमंत्रण मिळते. दरम्यान, यावर्षी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी 15 मे ते 15 ऑक्‍टोबर या पावसाळ्यातील कालावधीत रस्ते खोदकाम बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.