पार्किंग मधून ट्रेलर काढताना अपघात; चालकाचा मृत्यू

0
17

तळेगाव, दि. 9 (प्रतिनिधी)
पिंपरी, दि.९ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील कातवी येथे जय कंटेनर सर्व्हिस पार्किंग मध्ये एक कंटेनर चालक त्याच्या ताब्यातील कंटेनर पार्किंग मधून काढत असताना दुसऱ्या कंटेनरला धडकला. त्यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 7) पहाटे सव्वा चार वाजताच्या सुमारास घडली.

मोहम्मद अनिस इलियास खान (वय 59, रा. कातवी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान हा कंटेनर चालक होता. तो त्याच्या ताब्यातील ट्रेलर (एमएच 14/जीडी 6919) कातवी येथील जय कंटेनर सर्विस पार्किंग मधून काढत होता. त्यावेळी त्याच्या ट्रेलरची धडक शेजारी असलेल्या ट्रेलरला बसली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन मोहम्मद खान याचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.